TWEET : मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखव! : मनसे

0

बॉलिवूड गायक मिका सिंहला 12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या कॉन्सर्टवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिकाला खुलं आव्हान दिलं आहे.

मिका सिंहचं पाकिस्तान प्रेम पाहून मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी त्याला थेट आव्हान दिलं आहे. “मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच,” असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन इथे मिका सिंहचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

‘हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिका या व्हिडीओत म्हणाला.

मिकाचं ‘हमारा पाकिस्तान’ म्हणणं भारतीयांना खटकलं आहे.

LEAVE A REPLY

*