TWEET: ‘मंगळा’वर अडकलात तरी भारतीय दूतावास तुमच्या मदतीला धावून येईल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे उत्तर

0

ट्विटरच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नागरिकांना उत्तर देतात. यावरुनच विनोद करणाऱ्या एका नेटिझनलाही स्वराज यांनी उत्तर दिलं आहे.

‘मी मंगळावर अडकलो आहे. ९८७ दिवसांपूर्वी मंगळयानाने मला खाद्य रसद पोहोचवली होती, आती ती संपलीये तेव्हा ‘मंगळयान -२’ पाठवण्याची व्यवस्था कधी करताय?’ असं ट्विट करत त्याने सुषमा स्वराज आणि ‘इस्रो’ या दोघांनाही मेन्शन केलं.

काही अवधीतच या तरूणाला स्वराज यांनी असं उत्तर दिलं की ”तुम्ही भलेही मंगळावर अडकला असाल तरीही भारतीय दूतावास तिथेही तुमच्या मदतीला धावून येईल’ असं स्वराज यांनी ट्विट केलं.

LEAVE A REPLY

*