TWEET : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला ‘ट्युबलाइट’

0

‘ट्युबलाइट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आता जवळपास सर्वांनाच ठाऊक झालं आहे.

पण, ज्यांच्यापर्यंत या चित्रपटाबद्दल फारशी माहिती पोहोचली नाहीये त्यांच्यासाठी थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर या जगप्रसिद्ध भागात ‘ट्युबलाइट’चे पोस्टर लावण्यात आले आहेत.

सध्याच्या घडीला वापरलेली ही वेगवेगळी प्रसिद्धी तंत्र पाहता चित्रपट निर्मात्यांनी ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाहीये असंच पाहायला मिळत आहे.

‘ट्युबलाइट’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन टाईम्स स्क्वेअरचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एका गगनचुंबी इमारतीवर ट्युबलाइचा पोस्टर पाहायला मिळत असून, तो मोठ्या चतुराईने गर्दीच्या आणि दर्शनीय भागातच लावण्यात आला आहे

LEAVE A REPLY

*