TWEET : ‘ड्राईव्ह’ पुढच्या वर्षी २ मार्चला प्रदर्शित होणार

0

या वर्षाच्या सुरुवातीलाच करण जोहरने ‘ड्राईव्ह’ चित्रपटाची घोषणा केली.

या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

करण जोहरने नुकतंच ‘ड्राईव्ह’चं पहिलं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं असून, पुढच्या वर्षी २ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत. याआधी त्यांनी ‘दोस्ताना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप गाजला होता.

चित्रपटाविषयी तरुणने ट्विट केले की, ‘सात वर्षे, ३४५ दिवसांनंतर…मी सेटवर परतलोय.’

 

 

LEAVE A REPLY

*