TWEET : डॉ. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकचे पोस्टर रिलीज!

0

भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरही बायोपिक निर्मिती केली जात असून, त्याबाबतचे एक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आयुष्य देशातील प्रत्येक नागरिकांसाठी विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी केलेले काम अन् घालून दिलेले आदर्श पिढ्यानपिढ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे दिशादर्शकांचे काम करणार आहेत.

दरम्यान, त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.

डॉ. कलाम यांच्या बायोपिकचे पोस्टर इस्त्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी लॉन्च केले. या बायोपिकची निर्मिती तेलगू निर्माता अनिल सुंकारा आणि अभिषेक अग्रवाल करीत आहेत. यासाठी अनिल सुंकारा यांनी राज चेंगप्पा यांनी दिवंगत डॉ. कलाम यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे राइट्सही खरेदी केले आहेत.

या बायोपिकच्या रिलीजबाबत अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नसली तरी शूटिंग पूर्णत्वास असल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

*