TWEET : जब ‘अप्सरा’ मेट ‘बादशाह’

0
अभिनेता शाहरुख खानला भेटण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.
मराठी इंडस्ट्रीची ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे.
सोनालीची अलीकडेच शाहरुख खानसोबत भेट झाली.
शाहरुखच्या मुंबईतील रेड चिलीच्या ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली.
सोनालीने काही मराठी कलाकारांसोबत ट्विटरच्या ऑफिसला भेट दिली. ज्या बिल्डिंगमध्ये ट्विटरचे ऑफिस आहे, तिथेच शाहरुख खानचेही ऑफिस आहे. योगायोगाने सोनाली आणि शाहरुखची भेट घडून आली.
तिने तिच्या सोशल मीडियावर शाहरुखसोबतचा फोटो पोस्ट करुन ”काही छायाचित्रांना कॅप्शनची गरज नसते… बस नाम की काफी है…”, असे लिहिले आहे. सोबतच ‘माय क्रश’, ‘जबरा फॅन’, ‘व्हेन सोनाली मेट एसआरके’, ‘फॅन मोमेंट’ हे हॅशटॅगसुद्धा तिने दिले आहेत.

LEAVE A REPLY

*