TWEET: केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन

0

केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे निधन झाले आहे.

वयाच्या ६१ व्या वर्षी अनिल दवे यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या दवे यांच्यावर सध्या नर्मदा नदीच्या संवर्धनाची जबाबदारी होती.

अनिल दवे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यसभेचे खासदार असलेले अनिल दवे मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होते.

अनिल दवे यांच्याकडे पर्यावरण, वन आणि हवामान बदल या खात्यांचा स्वतंत्र प्रभार होता.

अनिल दवे यांच्या आकस्मिक निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

*