TWEET : ऑस्कर अकादमीच्या सदस्यांमध्ये दीपिकाचा समावेश!

0

अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या दीपिकाने हॉलिवूडमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.

दीपिकाची अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे (AMPAS) सदस्यत्व मिळाले असल्याचे तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

‘अकादमीच्या सदस्यत्वाचा सन्मान मिळाला,’ असे ट्विट दीपिकाने केले.

AMPAS ने मागील महिन्यात ५७ देशांमधील ७७४ नवीन सदस्यांना संस्थेच्या सदस्यत्वासाठी निमंत्रित केले. दीपिकासोबतच प्रियांका चोप्राचाही यात समावेश आहे.

यासंदर्भात प्रियांका म्हणाली की, ‘जगभरातील लोकांचा यात समावेश केल्याबद्दल मी अकादमीची आभारी आहे. अकादमीचे सदस्य म्हणून आमचे मत ते जाणून घेतात.’ या सदस्यांमध्ये ‘पिकू’ चित्रपटात दीपिकासोबत भूमिका साकारलेल्या बिग बी आणि इरफान खानचाही समावेश आहे.

ऑस्करमध्ये मतं नोंदवण्यासाठी अकादमीमध्ये निमंत्रित केलेल्या भारतीयांमध्ये आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, दिग्दर्शक गौतम घोसे आणि सलमान खान  यांचाही समावेश आहे. मात्र यामध्ये शाहरूख खानचे नाव नाहीये.

LEAVE A REPLY

*