TWEET: अरियाना ग्रांडेचा भावूक मेसेज!

0

मॅन्चेस्टर एरिनामध्ये सोमवारी रात्री पॉप सिंगर अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टदरम्यान दोन बॉम्बस्फोट झाले, ज्यात 20 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक लोक जखमी झाले.

पॉप सिंगर अरियाना ग्रांडे सुरक्षित आहे.

ज्यावेळी स्फोट झाला, तेव्हा अरियानाचा परफॉर्मन्स सुरु होता.

आपल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर दु:खी अरियानाने आज सकाळी (मंगळवार) ट्वीट करुन लोकांची माफी मागितली आहे.

“अगदीच कोलमडले आहे…मी यासाठी मनापासून माफी मागते, माझ्याकडे शब्द नाहीत, असं ट्वीट तिने केलं आहे.”
अरियानाचा युरोप टूर तूर्तास रद्द
इंग्लंडच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अरियानाने तिचा वर्ल्ड टूर स्थगित केला आहे. गुरुवारी लंडनमध्येही अरियाना परफॉर्म करणार नसून, तिने तिचा संपूर्ण युरोप टूर स्थगित केला आहे. इंग्लंड, बेल्जियम, पोलंड, जर्मनी आणि स्विसमध्ये तिच्या कॉन्सर्ट होणार होत्या. 

LEAVE A REPLY

*