‘हा’ कलाकार! साकारणार डॉ. हाथीची भूमिका

0
मुंबई : सब टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील डॉ हंसराज हाथी या भूमिकेसाठी चाललेली शोधाशोध थांबली आहे. गणेश चतुर्थीपासून निर्मल सोनी हे डॉ. हाथीच भूमिका साकारणार आहेत. निर्मल सोनी यांनीही आगोदर देखील डॉ. हाथीची भूमिका साकारली होती. त्याच्या एन्ट्रीचा भाग 13 सप्टेंबरला दाखवला जाणार आहे. दरम्यान, डॉ हंसराज हाथी भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे निधन झाले आहे. हे पात्र अतिशय लोकप्रिय आणि मजेशीर बनवण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.

 निर्मल सोनी बनले होते  ‘डॉ. हाथी’ 

सन २००८ मध्‍ये ज्‍यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सुरूवात झाली होती, त्‍यावेळी निर्मल सोनी यांनीच डॉ. हाथीची भूमिका केली होती. मात्र, नंतर ते शोपासून वेगळे झाले. २००९ मध्‍ये कवि कुमार आजाद यांनी डॉ. हाथीची भूमिका स्‍वीकारली. या भूमिकेबद्‍दल निर्मल सोनी म्‍हणाले, ‘आतापर्यंत माझ्‍याकडे माहिती आलेली नाही. जर मला या भूमिकेबद्‍दल विचारण्‍यात आले तर निश्चितच मी यावर विचार करेन. मी याआधीही डॉ. हाथीची भुमिका केली आहे.’

 

LEAVE A REPLY

*