‘तुझं माझं ब्रेक अप’मधील समीर व मीराच्या नात्याला मिळणार नवं वळण!

0
लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट  म्हणजे ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका. प्रेम विवाह झालेल्या जोडप्यांना आपलीशी वाटणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. समीर आणि मीराच्या नात्याची ही आगळीवेगळी कहाणी आता एका नवीन वळणावर आली आहे.

लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे हे दोघे आता एकमेकांनाच सहन करत आहेत. दोघांच्या घरच्या मंडळीनेही एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.

समीर आणि मीराच्या नात्यातील कटुता दूर करण्यासाठी आता मालिकेत एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. रविवारी असलेल्या एका तासाच्या विशेष भागात नवीन पात्राच्या आगमनाने समीर आणि मीराच्या नात्यात नवे वळण  बघायला मिळणार आहे.

मीराला समीरच्या आयुष्यातून दूर लोटण्याची एकही संधी लता सोडत नाही. मीरासुद्धा लताचा प्रत्येक डाव

उधळून लावण्यासाठी आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्टा करते आहे.

एका तासाच्या विशेष भागात लताने मिरासमोर ठेवलेल्या १० जाचक अटींचं आव्हान आणि हे आव्हान परतून लावण्याचा मीरानं केलेला निश्चय! दुसरीकडे समीर आणि मीराच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि लताला शह देण्यासाठी समीरची आजी (रोहिणी हट्टंगडी) यांचे आगमन होणार आहे.

LEAVE A REPLY

*