Type to search

हिट-चाट

तुला पाहते रे! मालिकेचा निरोप..

Share

नाशिक | प्रतिनिधी

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेने शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेली हि मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. विक्रांत सरंजामेच्या भूमिकेत असलेले सुबोध भावे आणि ईशाच्या भूमिकेतील गायत्री दातार हे दोघेही मालिकेचा निरोप घेतांना भावूक झाले होते.

छोट्या पडद्यावर चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालेल्या या मालिकेने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता. कलाकारांन सह प्रेक्षकवर्ग देखील भावूक झालेला दिसला.

मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा निरोप घेताना सुबोध आणि गायत्री या दोघांनीही सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

‘आणि आज मालिका संपली. तुम्हा सर्वांचे प्रेम आयुष्यभर ऊर्जा देत राहील. ‘तुला पाहते रे’च्या अख्ख्या टीमकडून तुम्हा प्रेक्षकांचे मन:पूर्वक धन्यवाद. विक्रांतकडून खूप प्रेम. भेटूया लवकरच. रामराम’, असे ट्विट करत सुबोधने सर्वांचे आभार मानले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!