#TTMM: टीटीएमएमचा टीझर प्रदर्शित

0

ललित आणि नेहा हे लाईटहाऊस या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आले.

आता ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे.

चित्रपटाचं प्रमुख आकर्षण असलेली ललित आणि नेहाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना भावली. नुकतंच रिलीज झालेल्या टीटीएमएम चित्रपटाच्या टीझरनेसुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाचा टीझर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो. या चित्रपटात नेहा आणि ललित यांची नोकझोक तर असणारच आहे पण त्याच सोबत चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून त्यात रोमान्स, ह्युमर, इमोशन्स या सगळ्या गोष्टींचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.

तुझं तू माझं मी चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे लग्नापासून दूर पळून आलेले ललित आणि नेहा एकमेकांना भेटतात आणि मग पुढे ते काय करतात हे चित्रपटात पाहणं खूपच रंजक ठरेल.

प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी या टीझरला चांगला प्रतिसाद देऊन आपली पसंती दर्शवली आहे.

थोड्याच दिवसात या टीझरला १ लाखाहून अधिक हिट्स मिळाले आहेत. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि इरॉस इंटरनॅशनल व वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘टीटीएमएम’ तुझं तू माझं मी चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*