आशिया खंडातीत ११ देशांना बसणार त्सुनामीचा फटका

0
आशिया खंडातील ११ देशांसह आखाती देशांना त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  ३१ डिसेंबर २०१७ पुर्वी अरबी समुद्रात भुकंप होऊन ताशी १२० ते १८० किमी वेगाने वादळ धडकण्याची शक्‍यता आहे.

तामिळनाडूतील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए.एस.पी. चे संचालक बाबू कालयील यांनी याबाबत शक्यता वर्तविली आहे.

याबाबत कालयील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे., यात मदतीचीही मागणी करण्यात आली आहे. यात असे म्हटले आहे की, या भूकंपाचा धक्का जगातील ११ देशांना बसणार आहे.

यात प्रामुख्याने भारत, चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

समुद्रातील भूकंपाची झळ आखाती देशांना बसण्याची शक्‍यताही या रिसर्च सेंटरने वर्तविली जात आहे. दरम्यान, कालयील यांनी पाठवलेल्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर आले नसल्याचे संचालक बाबू कालयील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*