Type to search

जनजागृतीसाठी प्रयत्न – आमदार नरहरी झिरवाळ

माझं नाशिक

जनजागृतीसाठी प्रयत्न – आमदार नरहरी झिरवाळ

Share
दिंडोरीसह नाशिक जिल्ह्याला सन 2030 पर्यंत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. शासनाच्या जलआराखड्यानुसार उर्ध्व गोदावरी खोर्‍यात पाणी साठे करता येणार नाही. शासनाच्या नवीन पाणी धोरणाची अंमलबजावणी झाल्यास नाशिक जिल्ह्याला व शेतकर्‍यांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पाणीप्रश्नाबाबत केवळ दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघातच नव्हे, तर जिल्ह्यात व राज्यात जनतेला जागे करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली.दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागातील वळणयोजनांच्या कामाला गती दिली. त्यामुळे तालुक्यातील धरणे भरण्यास उपयोग झाला आहे. मी आमदार झाल्यापासून सर्वप्रथम तालुक्यातील खुंटलेल्या कामांचा आढावा घेतला. मी पाच वर्षे आमदार नसलो तरीही काम करीत होतो.

त्यामुळे सर्व अपूर्ण कामांची व नव्याने करायच्या कामांची माहिती होती. त्यामुळे तातडीने पुढील कामांचे नियोजन केले. विशेषत: कोराटे, करंजाळी सबस्टेशनच्या कामाला मंजुरी घेतली व गती दिली.ते कामे पूर्ण झाली. परमोरी, निगडोळ येथील 33 के.व्ही. सबस्टेशनलाही गती दिली.

गोळशी फाटा येथे 220 एमव्हीए सबस्टेशन ला मंजुरी घेतली. ते पूर्ण झाले. दिंडोरी तालुक्यात जे वळण बंधारे होते. त्यात मांजरपाडा वळण योजनेला गती देण्याचे काम केले. त्यामुळे शासनाने या प्रकल्पासाठी पैसे मंजूर केले. मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. तथापि स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. शासनाने अद्याप स्थानिकांना पाण्याचे आरक्षण दिले नाही.कबुल केल्याप्रमाणे पाझरतलाव बांधुन दिले नाही.यापुढील काळात त्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे.

वळणबंधार्‍यांचे कामे अपूर्ण होते. या कामांना गती दिली त्या अनुषंगाने अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात येत आहे. वळण बंधार्‍यावरील पुलांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे दळणवळणास होणारा अडथळा दूर झाला आहे. उरलेल्या काळात या वळण योजनांना गती दिली जाईल. जलयुक्त शिवाराची अनेक कामे तालुक्यात नव्याने आणले आहेत. या कामांना वेग आला असून, कामेही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. शासनाचे जलयुक्त शिवाराचे निकष चुकीचे असून तो बदलण्याचा आपला प्रयत्न आहे. जलयुक्त शिवारात काम करण्यात आपणांस खर्च जास्त लागतो. परंतू त्याच्याऐवजी ठिकठिकाणी सिमेंट बंधारे, नाला बांध केले, तर कमी खर्चात जास्त कामे होतील व जास्त जलसाठा होवून शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल.

वणी खुर्द, जोरण,अबांड या लघुपाटबंधार्‍यांच्या अपूर्ण कामांना गती देण्यात आलेली आहे. त्यांना विशेष बाब म्हणून आपण मंजुरी आणली. या तिन्ही ल.पा.योजनांमुळे तालूक्याला फायदा झाला आहे.विशेषत: पश्चिम भागातील शेतकरी आता बारमाही पीक पद्धती अंमलात आणू लागला आहे.पश्चिम भागात द्राक्षबागा फुलू लागल्या आहे.येथील शेतकरी हिरव्या पाल्या भाज्यांचे उत्पन्न घेऊ लागला आहे.

पूर्वी हीच शेती केवळ भातशेती होत होती. दिंडोरी व वणी पाणी योजना आपण विशेष बाब म्हणून मंजूर केली होती. मात्र, त्यांचे काम रखडले होते. या कामांना गती दिली. सध्या दिंडोरी व वणी शहरात पाणी योजनेचे पाणी पडले असून, इतर कामांना वेग घेतला आहे. त्यात अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, पाणी साठवण टाकी बांधणे आदी कामांचा समावेश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दिंडोरी येथे अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून श्री ईशान्येश्वर अभ्यासिकेसाठी सुमारे 1 कोटी 16 लाख रुपये मंजूर केले.

आज या अभ्यासिकेतून गरीब विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय झाली असून त्यातुन अधिकारी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.आदिवासी सांस्कृतिक भवन दिंडोरी शहरात उभे राहिले असुन, त्यामुळे गोरगरिबांच्या लग्नाची सुविधा झाली असुन कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहे.करंजाळी ता.पेठ येथेही अभ्यासिकेसाठी 80 लाख रुपये मंजूर केले असून काम सुरु झाले आहे.

गेल्या तीन वर्षात आपण शेतकरी हित जोपासण्याचा प्रयत्न केला.विधानसभेत शेतकर्‍यांचा प्रश्न लावून धरला.प्रतिकात्मक विधानसभेचे कामकाज केले.त्यांमुळे आपल्याला निलंबितही व्हावे लागले होते. शेतकर्‍यांनी कर्जमाफी द्यावी हा मुद्दा आपण प्रथम पासूनच लावून धरलेला होता. परंतु, शासन जुमानत नव्हते. या पार्श्वभूमीवर मी स्वत: विधानसभेत आंदोलन केले व शासनाचे लक्ष वेधले.

शासन तरीही लक्ष देत नसल्याने आपणास काळजीने लढा द्यावा लागला; यासाठी विधानसभेत गदारोळ करावा लागला. आपल्याला निलंबित केले.परंतु शेतकर्‍यांसाठी आपली आमदारकी गेली तरी आपल्याला पर्वा नव्हती व भविष्यातही रहाणार नाही. त्यामुळे निलंबनाचे दु:ख नव्हते.त्यानंतर आमच्या पक्षाच्यावतीने संघर्ष यात्रा काढण्यात आली.त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये जागृती झाली. शेतकरी आंदोलन पेटले.

त्यातही आपण स्वत: सहभागी झालो. रास्ता रोकोत अ‍ॅडमिट असतांनाही आलो.शेतकरी हाच पक्ष आहे.शेवटी सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला.परंतु शासनाने शेतकर्‍यांना फसवलेच आहे.त्यामुळे आता पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज निर्माण झाली आहे.दिंडोरी व पेठ तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी आपला प्रयत्न आहे.

प्रश्न:- आपले आगामी नियोजन काय?

उत्तर:- दिंडोरी, पेठसह सर्व नाशिक व नगर जिल्ह्यावर आगामी काळात पाणीटंचाईचे संकट येऊ पहात आहे.शासनाने जलआराखडा करण्यास बक्षी आयोगास सांगितले होते. या आयोगाने जायकवाडी धरण भरण्यासाठी काही तरतुदी सुचवल्या आहेत. या तरतुदींनुसार उर्ध्व गोदावरी खोर्‍यात पाणीसाठे करण्यास बंदी घातली जाणार आहे.गोदावरी खोर्‍यातील नार-पारचे पाणी अडवणे अवघड ठरणार आहे.पूर्व भागाकडे पाणी वळवता येणार नाही.नव्याने पाण्याचे प्रकल्प करता येणार नाही.जर असे झाले तर डोंगर उतारावर जे गावे आहे,त्यांनी करायचे काय? पाणी आणायचे कुठून? त्यामुळे पाणीसाठा बंदीचा हा निर्णय नाशिक व नगर जिल्ह्याला अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात शेततळे बांधायचे झाले; तरी अडचणी तयार होणार आहे.

आपल्याला साधा विटांचा बांध टाकून पाणी अडवणे अवघड होणार आहे. त्यासाठी जनहित याचिका दाखल करावी लागणार आहे.आगामी काळात आपल्याला पेठ एमआयडीसी सुुरु करणे व नाशिक-वणी रस्ता चौपदरीकरण करणे हे दोन प्रमुख कामे करावयाची आहेत.वणी नाशिक रस्त्यावर अनेक अपघात होत असतात व आता रहदारीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मागील काळातही आपण पाठपुरावा केला होता.आताही आपला पाठपुरावा सुरु केलेला आहे. पेठ ये्थे एमआयडीसी बंद पडलेली आहे.

ही एमआयडीसी सुरु करण्यासाठी प्रयंत्न सुरु केलेले आहे. त्यासाठी शासनाच्या अधिकार्‍यांना अडचणी सोडवण्यासाठी आदेश दिलेले आहे. दिंडोरी व पेठ एमआयडीसीतुन स्थानिक युवक उदयोजक उभे रहावे, ही आपली इच्छा आहे. वळणयोजनांचा पाठपुरावा करुन पाणी अधिक मिळावे.माळेगाव काजी येथे 13 आदिवासी हुतात्मा झालेले आहे. हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपण माळेगाव येथे आदिवासी हुतात्मा स्मारक बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकासाठीही आपल्याला अधिक योगदान दयायचे आहे.त्यामुळे कामाचा पाठपुरावा सुरु आहे.

देवघर मंदिराचे काम पूर्ण व्हावे यांसाठी आपला सातत्याने प्रयत्न सुुरु आहे.देवघर मंदिर आपले श्रद्धास्थान आहे.त्याची अनुभूति आपणास आहे. दिंडोरी व पेठ तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते पूल यांचे प्रस्ताव सादर केलेले आहे. मागील साडेतीन वर्षात जवळपास 250 ते 300 कोटी रुपयांचे रस्ते झालेेले आहे.नव्याने आश्रमशाळांचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे.ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे कामे करणे सुरु केले आहे. आपल्या कारकिर्दीत स्मरणात राहतील अशी कामे करण्याचा आपला मानस आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!