Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : नोकरीच्या शोधात आलेल्या संशयिताने फोडले एटीएम

Share

नाशिक : प्रतिनिधी

रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयितास सरकारवाडा बीट मार्शलने पकडले. उत्तरप्रदेश येथील हा संशयित असून तो नोकरीच्या शोधात नाशिकला आला असल्याचे समजते.

सनी रावत (19, रा. सध्या रा. पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेले सराफ बाजार पोलीस चौकीचे बीट मार्शल गवळी व होमगार्ड शिंदे यांना पंजाब नॅशनल बँकेचे एटीएमचे प्रवेशद्वार उघडे दिसले.

त्यामुळे त्यांनी एटीएम केंद्रात जाऊन पाहणी करीत संशयित सनीला पकडले. त्यास सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले असून पोलीस चौकशी करीत आहे.

सनी हा नोकरीच्या शोधात तीन महिन्यांपूर्वी शहरात आला असून तो गंगेवरच राहत असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!