Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

तृप्ती देसाई यांनी अण्णा हजारे यांची घेतली भेट

Share
तृप्ती देसाई यांनी अण्णा हजारे यांची घेतली भेट, Trupati Desai Visite Anna Hajare Parner

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महिलांच्या प्रश्नांवर गेल्या आठ दिवस पासून मौन आंदोलन सुरू केले आहे. या पाश्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली.

यावेळी अण्णा हजारे यांनी महिलांच्या अत्याचाराच्या वाढलेल्या घटना आणि त्या घटनांबाबत न्यायालयात सुनावणी प्रलंबित राहण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख देसाई म्हणाल्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तार नंतर पहिल्याच बैठकीत महिलांच्या अत्याचार घटनेत लवकर सुनावणी पूर्ण होऊन आरोपीना शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा करावा असे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत. यावेळी दत्ता आवारी, अमोल झेंडे, श्याम पठाडे, महेबूब शेख आदी उपस्थित होते.

माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या, जनतेच्या पैशातून माझ्या सारख्या फकीर व्यक्तीला सुरक्षा व्यवस्था दिली जात आहे पण मी अनेकदा सांगूनही सुरक्षा व्यवस्था पुन्हा सुरक्षा पुरवत असून मला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नको, ती काढून घ्या असे पत्र अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!