जळगाव : ढाब्यासमोर झोपलेल्या ट्रक चालकाचा झोपतच मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव– औद्योगिक वसाहतमध्ये ट्रक चालकाचा झोपेतच मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास क्लिनरच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामदास देविदास बैरागी (वय ५५, रा.अजयनगर, वरणगाव, ता. भुसावळ हे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (जळगाव) येथे गॅस हंड्या वाहतूक करणार्‍या ट्रकवर चालक म्हणून कामाला आहेत. त्यांनी सोमवारी रात्री ट्रक पार्किंगला लावला. जेवणानंतर ते एमआयडीसी परिसरातील पी सेक्टरमधील महामार्गावरील पेट्रोल पंपासमोरील नाना यांच्या ढाबासमोर झोपले. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ट्रकवरील सहाय्यक रमेश सोनार हा त्यांना उठवण्यासाठी गेला. परंतु, रामदास बैरागी हे मयत स्थितीत आढळून आले.

ट्रकवरील क्लिनरने नशिराबाद येथे राहणारे ट्रक मालक नरेंद्रसिंग शीतलसिंग यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार नरेंद्र सिंग शीतल सिंग यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रतिलाल पवार हे करीत आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
ट्रकचालक रामदास बैरागी यांना या अगोदर चार-पाच महिन्यांपूर्वी हदयविकाराचा झटका आला होता. असाच काही अचानक त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांच्या नातेवाईकांनी वर्तवला. त्यांचा मुलगाही ट्रकचालक असून तो सध्या कोलकाता येथे आहे. त्याला या घटनेबाबत कळवण्यात आले आहे. तो बुधवारी घरी येईल. त्यानंतर मृत ट्कचालकावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *