धावत्या ट्रकमध्येच आला चालकाला हृदयविकाराचा धक्का; प्रसंगावधान राखत प्रवाशानेच मिळवला ट्रकचा ताबा

0
नांदगांव (प्रतिनिधी)। बोलठाण येथून रिकामा मालवाहतूक ट्रक  घेऊन परतत असतांना  ट्रकचालकास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर चालक भिवा  काशिनाथ गोटे (वय ६५) यांनी   प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या    कडेला थांबवला पण ते रस्त्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना नांदगाव औरंगाबाद रस्त्यावरील जळगाव बुदृक शिवारातील माणिकपुंज फाट्याजवळ घडली. बोलठाण येथून रिकामा मालवाहतूक ट्रक क्रमांक (एम एच ४१जी -६७९४)  नांदगांवच्या दिशेने घेऊन परतत असतांना औरंगाबाद रस्त्यावरील माणिकपुंज फाट्याजवळ चालक भिवा  काशिनाथ गोटे यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला.

त्यात ते खाली कोसळले . झटक्याची तीव्रता एवढी होती की ते ट्रकमधून खाली पडून जागीच गतप्राण झाले.  दरम्यान, गाडी रस्त्यावर सुरु असतांना चालक गोटे हे गाडी बाहेर पडल्याचे बघून गाडीत बसलेल्या केबिनमध्ये इतर प्रवासी बसलेल्या पैकी एकाने समोर झालेली घटना बघत प्रसंगावधान राखले.

त्यानंतर त्याने गाडीचा ताबा घेऊन ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला. औरंगाबाद-नांदगांवरोड इंधन, बस, छोटी-मोठी वाहनांची  वर्दळ असते.

यावेळी मात्र एकही वाहन नसल्याने मोठा  अनर्थ टळला. नांदगांव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

*