Video : त्र्यंबकेश्वरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा रथोत्सव उत्साहात

0
त्र्यंबकेश्वर(मोहन देवरे) | त्र्यंबकेश्वरमध्ये त्रिपुरारी पौर्णीमेनिमित्त रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.  रथोत्सवाच्या निमित्ताने अनेक भाविकांनी आजचा दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये घालवला. दुपारी चार वाजेच्या सुमारास या रथोत्सवाला प्रारंभ झाला.

दुपारी चार वाजेच्या सुमारास रथ पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिरातून सवाद्य मिरवणूक आणि भगवान शिवचा जयजयकार करत भक्तिमय वातावरणात कुशावार्ताकडे कूच केली. यंदा 6 बैलजोड्या रथ ओढण्यासाठी होत्या.  

या भव्य रथवार ब्रह्मदेवाची मूर्ति जागी होती साक्षात भगवान त्र्यंबकेश्वराचा रथ हाकतात अशी आख्यायिका आहे. कुशावर्तावर परंपरेनुसार पूजा विधी संपन्न होऊन रथ परतीच्या मार्गी लागला.

यावेळी त्र्यंबक नगरीतील रस्ते रांगोळीने फुलून गेले होते. रथ जसजसा पुढे जात होते तसतसा रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चेअरमन जिल्हा न्यायाधीश एम एस बोधनकर, विश्वस्त व माजी नगराध्यक्ष कैलास घुले श्रीकांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल, सचिन पाचोरकर, जयंत शिखर, ललीता शिंदे यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थित होते.

व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा

त्र्यंबकेश्वराची देव दिवाळी- त्रिपुरारी पौणिमा

LEAVE A REPLY

*