Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; शहरातील मंदिरे सजली

Share

नाशिक | प्रतिनिधी

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या पौर्णिमेनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी दीपोत्सव व तुळशीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले. शहरातील मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

त्रिपूरारी पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असते. आज सायंकाळी वाती लावण्यासाठी महिलांनी कपालेश्वर मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

शहरातील विविध मंदिरांत व दुकानांमध्ये त्रिपूर वाती विक्रीस उपलब्ध होत्या. अनेक महिलांनी या वाती तुपात भिजवून मंदिर परिसरात लावलेल्या दिसून आल्या. या वाती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली.

कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र येऊन बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात अशी परंपरा आहे.

बालाजी मंदिरातही दीपोत्सव

गंगापूरच्या बालाजी मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला. बालाजी मंदिरातील दीपोत्सवाचे दृश्य पहाण्यासाठी अनेक भक्तांनी रात्री हजेरी लावली होती. नाशिक शहरातील सर्व मंदिरांवर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने विद्युत रोषणाई  करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!