त्र्यंबकराजाने पाहिली शिवभक्तांची परीक्षा; श्रावणात झाला कृपावंत

0

त्र्यंबकेश्वर दि 27 (मोहन देवरे) : देव भाविकांची परीक्षा पाहतो, या वाक्याची प्रचिती नुकतीच शिवभक्तांना त्र्यंबकेश्वर मंदिरात आली.

झाले असे,  ८ जूनला पावसाचे आगमन झाले. त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊसमान चांगले असल्याने सतत येथे पाऊस असतो. या काळात त्र्यंबकेश्वर मंदिरात जाणारे शिवभक्त पावसाने भिजले.

मात्र तोपर्यंत पावसाचा जोर असूनही त्यांच्या डोक्यावर मंडप किंवा निवारा आला नाही. मात्र आता श्रावणात पाऊस संपण्याच्या काळात त्र्यंबक राजाच्या कृपेने भाविकांचे भाग्य जागृत झाले आहे.

सुमारे ५० दिवसांच्या पावसात भिजण्याची भाविकांची परीक्षा झाल्यानंतर आता येत्या श्रावणी सोमवारी त्यांना दर्शनरांगेत मंडपाचा लाभ होणार आहे.

उशिरा जाग आलेल्या विश्वस्त मंडळाने आता त्र्यंबकराजाच्या पूर्व दरवाजावर मंडप टाकणे सुरू केले आहे. भाविकांचा पावसापासून बचाव व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे.

यासंदर्भातील सर्वप्रथम देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर माध्यमे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ट्रस्टला जाग आणली. आता भाड्याने मंडप टाकण्याचे नियोजन सुरू आहे.

LEAVE A REPLY

*