सोमवारी गर्दी वाढल्याने त्र्यंबकेश्वरला देणगी दर्शन बंद

0

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) ता. १४ : चौथ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी काल आणि आज मिळून सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. दरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस सुरू आहे.

तसेच ब्रम्हगिरी फेरीसाठी सुमारे ४० हजार भाविक आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी गर्दी वाढल्याने येथील देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

रविवार आणि १५ ऑगस्टच्या सुटीनिमित्त बाहेरगावच्या लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन रांग मंडपाबाहेर संगम घाटाचे पुढे गेल्याचे चित्र आज दिसत आहे.

उत्तर महादरवाजा येथे रुपये दोनशे भरून देणगी दर्शन होते. आज येथेही गर्दी झाल्याने देणगी दर्शन  तात्पुरते बंद करणेत आले.

श्रावण महिना २१ला संपणार आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

*