Blog : संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारीची परंपरा जाणून घ्या सविस्तर

0
त्र्यंबकेश्वर | त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेची परंपरा ही देहूकर फडाची  पूर्वापार चालत आली असून ती आजही अबाधितपणे चालू आहे.

जगद्गगुरु तुकोबाराय यांच्या घराण्यातील थोर सत्पुरुष पूज्य बाबाजी महाराज हे त्रंबकेश्वर क्षेत्री आले. विशेष म्हणजे तुकोबारायांचे पिढीजात घराण्यात उपाध्येय करणारे वे. शा. सं. कनांव घराणे आजही त्र्यंबकेश्वर येथे आहे.

तुकाराम महाराजांच्या वंशातील देहुकर घराण्यातील प्रत्येक पिढीतील पुरुषांच्या ह्याती पर्यंत संपूर्ण वंशावळीची नावे त्यांच्याकडे आहेत. यावरून त्रंबकेश्वर येथे देहूकर घराण्याचा पिढ्यानपिढ्या  येण्याचा सबंध कळून येतो.

पूज्य बाबाजी महाराज हे साक्षात्कारी संत होऊन गेले. ते पौष वद्य वारीला त्र्यंबकेश्वरी आल्याचा शके १७७५ कागदोपत्री उल्लेख सापडतो. पुज्य बाबाजी महाराज तसेच जोपूलचे पाटील बाबा यांनी  श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी प्रसिद्धी आणून फडावरील अन्य सहकार्यांसह पौष वारीचे महत्व विशेष वाढविले.

ते स्वत: निवृत्तीनाथांची वारी करत असत. पौष वारीस पंढरीहून निवृत्तीनाथांसह पायी वारी घेऊन जाण्याची प्रथा देहूकरांनी केदारबाबा कराडकर, बेलापूरकर, इ. अनेक दिंडीवाल्यांच्या वारकरी मंडळींसह सुमारे २०० वर्षापूर्वी सुरु केली.

तसेच श्रीगुरू भाऊसाहेब महाराज देहूकर यांचे आज्ञेवरून देहूकर फडावरील त्यांचे अनुग्रहित वारकरी अनाजीबुआ अजुतीकर यांनी निवृत्तीनाथ-पंढरीची महिना वारी सुरु केली. नंतर पुढे त्याच पद्धतीने सद्गगुरु सोपानकाका महाराज देहूकर यांच्या आद्नेचे निवृत्तीबुवा टिळेकर यांनी महिना निवृत्तीनाथ-पंढरीची वारी सुरु केली आणि अनाजीबुवाची ही परंपरा पुढे चालू ठेवली.

ती आजतागायत चालू आहे. निवृत्तीबुवा तिळेकर यांचे पुतणे दत्तोबा टिळेकर हे सध्या हा नेम चालवितात. देहूकर फडाचे जेष्ठ अधिकारी श्रीगुरू ज्ञानेश्वर माउली महाराज देहूकर यांच्या कीर्तन सेवेचा प्रांरंभ पौष यात्रेवेळी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीपुढे वयाच्या १६व्या वर्षी झाला.

पौष वारीमध्ये कराडकर, बेलापूर, धोरालकर, माई इ. दिंडीवाले सहभागी होत. पौष मासी दिंडीची प्रथा चालू करण्याचे कारण की कार्तिक वद्य आळंदीची वारी, मार्गशीर्श वद्य सासवडची वारी, इ. प्रमाणे पौष वद्य श्री संत निवृत्तीनाथ वारी सुरु झाली. दुसरे कारण असे की जेष्ठ वाड्यात निवृत्तीनाथांचा समाधी काळ असतो.

तरी आषाढी वारी करिता सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरी जाण्यास निघतात आणि निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा त्या दृष्टीने जेष्ठ शोधतच निघतो. म्हणून सर्व पाम्प्र्दायिक वारकरीचे दृष्टीने पौष वाद्यात निवृत्तीनाथांची वारी व जेष्ठात  पालखी सोहळा अशी परंपरा सुरु झाली. तेव्हा श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पौष वारीचे वेळी भजन, दिंडी, कीर्तन, पालखी सोहळा आशी परंपरा सुरु झाली.

तेव्हा श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पौष वारीचे वेळी भजन, दिंडी, कीर्तन, पालखीसोहळा अशी परंपरा सुरु झाली. तेव्हा श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पौष वारीचे वेळी भजन, दिंडी, कीर्तन, पालखी सोहळा दिंडी मिरवणूक हे सर्व आजही देहूकर फड मार्फत पार पाडले जातात.

पौष वद्य दशमी ते पौष वद्य त्रयोदशी पर्यंत दिंडी, कीर्तन, जागर, खिरापत कीर्तन, काला कीर्तन फडमार्फात साजरे केले जातात आणि स्वत: फडाचे मालक देहूकर महाराज हे कीर्तन सेवा करतात. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातून चालत आलेली श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेची ही परंपरा आजची निष्ठेने पार पाडली जाते.

शेवटी काला झाल्यानंतर मानकर्यांना नारळ प्रसाद देण्याचा कार्यक्रम होतो. पूर्वी हा नारळ प्रसाद देहूकर महाराजांच्या हस्ते दिला जात होता आता तो संस्तानाच्या विद्यमान अध्यक्षान कडून दिला जातो. त्या मध्ये बेलापूरकर, कराडकर, आळंदीकर, पैठणकर, आदी करून दिंडीवाल्यांचा विशेष सहभाग असतो.

दिलीप ताम्हणकर (०२५३ २३९७८४७)

LEAVE A REPLY

*