नाशिकची धावपटू प्रगतीने मिळवले राष्ट्रीय स्तरावर ‘रौप्य’

0
त्र्यंबकेश्वर | पिंपरीच्या धावपटू प्रगती मुळानेने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तिच्या यशाबद्दल आमदार निर्मला गावित यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर तालुक्यातील पिंपरी येथील धावपटू प्रगती गणपत मुळाणे हिने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.
तिच्या यशाने त्र्यंबक तालुक्यातील सावरपाडा एक्स्प्रेस कविता राउतनंतर प्रगतीने राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या स्पर्धेत १७ वर्ष आतील प्रगतीने  विजय संपादन केला. तिच्या यशाने तिची पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आमदार निर्मला गावित यांच्याकडून प्रगतीचे अभिनंदन करण्यात आले आहे. राष्टवादी तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कॉंगेस युवक अध्यक्ष दिलीप मुळाणे, दिनकर मोरे यांच्यासह प्रगतीचे आई वडील उपस्थित होते.
प्रगती मुळाणे मुळची पिप्री येथील आहे.  ती सध्या भोसला मिलिटरी येथे ११ वीचे शिक्षण घेत असून लहानपणापासूनच  तिला धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेत होती.
तिने जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच काही दिवसापूर्वी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याच्या शालेय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक व ३००० मिटर स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.
साई केंद्राचे प्रशिक्षक देवेद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा विजयी रथ सुरु आहे. तिच्या या यशाने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

*