त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपाला ’डिमांड’; तिकीटासाठी इच्छूकांच्या रांगा

0

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : लवकरच होऊ घातलेल्या त्र्यंबकेश्वर नगर पालिकेच्या निवडणूकीत नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी सध्या अनेकांच्या राजकीय आशा पल्लवित झाल्या असून बऱ्याच जणांना नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत.

याचाच प्रत्यय आज भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक मुलाखतींदरम्यान आला. आज नगरपालिका निवडणूकांसाठी भाजपाच्या मुलाखतींसाठी इच्छूकांनी अक्षरश: रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या मुलाखतींसाठी दोघा इच्छूकांनी तर रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.

 

LEAVE A REPLY

*