Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ञ्यंबकेश्वर : किकवी धरण झाले तर गोदावरीचा पूर कमी होणार…

Share

ञ्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी

नाशिक आणि गोदाकाठच्या पुढील गावांचीची आजची परिस्थती पाहता किकवी धरण झाले असते तर पुर आला नसता अशी भावन नागरिकांच्या मनात आहे. नाशिकसह गोदाकाठी राहणा-या रहिवाशांना पुराच्या समस्येने वेढले आहे. गंगापुर धरणाच्या उर्ध्वबाजूस म्हणजेच उर्ध्व गोदावरी प्रकल्प राबविल्यास अतीवृष्टी दरम्यान निर्माण होणा-या पुराच्या संकटाची तिव्रता कितीतरी पटीने कमी होण्यास मदत होणार आहे.यामध्ये किकवी धरणाचा बासनात गुंढाळलेला प्रकल्प बांधणे तसेच अन्य काही धरणांची उंची वाढविणे आणि गाळ काढणे या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

गंगापुर धरणासह गाळ काढण्याचे काम खर्चिक आहे म्हणून टाळले जाते मात्र आता पुरामुळे होणारी वित्तीय हानी आणि जिवीत हानी पाहता त्यापुढे या कामांना बाजुला ठेवणे उचीत होणार नाही. शासन यंत्रणा,लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक अशा सर्व घटकांना टांगते ठेवणारी पुर समस्येवर उपाय योजना करणे अत्यावश्यक बाब ठरते आहे. गोदावरी नदीवर धरण बांधायचे नाही या नियमावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

शुक्रवार पासून संततधार सुरू असलेला पाऊस आता अधुन मधुन विश्रांती घेत असल्याने जनजिवन स्थिरावण्याची आशा निर्माण झाली आहे. ञ्यंबकेश्वर येथे ब्राम्हगिरी पर्वत रांगेत पाऊस झाल्यास नाशिकला गंगापुर धरणाचा साठा वाढतो. जून अखेर पर्यंत पाऊस झालेला नसल्याने ञ्यंबकच्या पावसाकडे नाशिकसह सर्व जिल्हा अतुरतेने पाहात होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पावसाने धरलेला जोर पाहून आता हा पाऊस कधी थांबणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ञ्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते या नदीला अनेक ओहळ नाले येवून मिळतात आणि चक्रतीर्था पासून मोठा प्रवाह निर्माण होतो. गोदावरी नदीवर बेझे येथे गोतमी प्रकल्प झाला तेव्हा पासून मुळ गोदावरीचा प्रवाह आडविला गेल्याने कमी झाला आहे. तथापि गोदावरीला ख-या अर्थाने भरीव जोड देणारी किकवी हि नदी आहे. किकवी नदीवर गौतमी प्रकल्पाच्या बाजूस बेझे गावच्या अलीकडे किकवी धरण सन २०११ मध्ये प्रस्तावीत करण्यात आले होते.

या धरणाची साठवण क्षमता जवळपास २५०० दशलक्ष घनफुट असल्याचे आणि गंगापुर धरणाचे स्टोअरेज म्हणून हे धरण संबोधण्यात आले. किकवी धरणासाठी एकूण ७२१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार होती. त्यातील २०७ हेक्टर जमीन वनविभागाची आहे. त्यातही सुपीक जमीन अत्यंत कमी असल्याने शेतक-यांचा विरोध होणार नाही. धरणाचा फायदा सिंचनासाठी होणे आवश्यक होते. सुरूवातीस ६०० कोटींचा हा प्रकल्प नंतर रखडला आणि शेवटी गुंडाळण्यात आला. वास्तविक पाहता आज मितीस किकवीचा प्रवाह थेट गंगापुर धरणात जातो. ब्रम्हगिरी पटटयात रविवारी २४ तासात ३९६ मिमी पाऊस झाला. हे सर्व पाणी थेट गांगपुर धरणात गेल्यानंतर धरणातून विसर्जीत करणे आणि पुर येणे साहजीक आहे.

किकवी धरण होणे आवश्यक आहे. तसेच माळेगाव येथील पाथर्डे धरण देखील होणे गरजेचे आहे. पाथर्डे धरणात देखील वन खात्याची जमीन प्रमुख्याने जाणार आहे. या भागातून येणारे पाणी अडविल्यास त्याचा फायदा सिंचनासाठी होईल रोजगार निर्मीती वाढेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुराची टांगती तलावर राहणार नाही.

ञ्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी येथील अंजनी धरण, सापगाव येथील तळेगाव काचुर्ली धरण, अंबोली धरण अशा काही धरणांचा गाळ काढणे, त्यांची उंची वाढविणे अशी कामे येत्या उन्हाळयात प्राधान्याने होणे आवश्यक आहे. अंबोली धरण गाळाने भरले आहे व मुळातच त्याची खोली पाहिजे तशी झालेली नाही त्यामुळे अल्पावधीत ते ओव्हर फ्लो होत असते व किकवी नदीचा प्रवाह वाढतो.

त्यामुळे थेट गंगापुर धरणात जाणारा प्रवाह अडविणे शक्य होणार आहे. त्याच प्रमाणे वाघेरा येथील धरण आणि कश्यपी धरण यांची देखील उंची वाढवून व गाळ काढून साठवण क्षमता वाढविणे शक्य आहे. गंगापुर धरणाचा भार अधिकाधीक हलका करण्याचा प्रयत्न करतांनाच त्यातील गाळ काढून साठवण क्षमता वाढविल्यास पुराचा धोका राहणार नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!