निवडणुकीमुळे त्र्यंबक नगरपरिषदेला अच्छे दिन; मिळाले २३ लाखांचे उत्पन्न

0

त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) ता. १८ : लवकरच होऊ घातलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणूकांमुळे  येथील नगरपरिषदेला अच्छे दिन आले असून केवळ दोनच दिवसात करापोटी २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची नोंद झाली आहे.

इच्छूक उमेदवाराकडे जर नगरपालिकेची थकबाकी असेल, तर त्याचा अर्ज बाद होतो. आपला अर्ज बाद होऊ नये या भीतीपोटी अनेकांनी दोन दिवसात घरपट्टी, पाणी पट्टी, गाळे भाडे यापोटी साडे बावीस लाख रुपये नगरपरिषदेकडे जमा केले आहेत. कर निरीक्षक संजय पेखळे यांनी ही माहिती दिली.

शनिअमावस्येला भरला उमेदवारी अर्ज

आजच्या शनी अमावस्येच्या मुहूर्तावर कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वार्ड क्रमांक ५ ब मधून दिलीप पवार,  तर १ अ मधून अलका डगले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान शिवसेनेतर्फे इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आज सायंकाळी होणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*