त्र्यंबक नगरपरिषद निवडणूक : आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

0
त्र्यंबकेश्वर |   त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.  प्रभागातील 17 जागांसाठी 48 आणि नगराध्यक्षांसाठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.  बहुतांश उमेदवारांनी एका पेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत तर पक्षाच्या ए बी फॉर्म बाबत शाश्वती नसल्याने एका पेक्षा अधिक पक्ष चिन्ह असलेले अर्ज दाखल झाले आहेत.

यापुर्वी नगराध्यपदाचा 1 आणि प्रभागात 3 अर्ज आलेले होते. एकुण प्रभागात 51 आणि नगराध्यक्षांचे 2अर्ज दाखल झाले आहेत. एकाही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत अर्ज अद्याप दिलेले नाहीत.

आज अखेरची मुदत असून किमान 100 अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगर पालिका कार्यालयासमोर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी उसळल्याने जत्रेचे स्वरूप आले होते.

पालिका कार्यालयात एका उमेदवारासोबत पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येत होता. 17 जागांपैकी 9 महिलांसाठी आरक्षीत आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी काही जागावर महिलांना उमेदवारी देण्यात येत आहे. पालिका परिसरात समर्थकांच्या झालेल्या गर्दीत महिलांची संख्या लक्षणीय होती.

प्रभाग 5 मधिल अनुसुचित जाती उमेदवार अनिता शांताराम बागुल यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी नाशिक जिल्हा आरपीआय अध्यक्ष प्रकाश लोंढे उपस्थित राहीले. शहरातील भाजपा पदाधिकारी प्रभाग क्रमांक 8 च्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतांना उपस्थित होते.

राजकीय पक्षांचे पत्ते आज(बुधवारी) उघडणार आहेत.  राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. इच्छुक उमेदवार पक्षचिन्ह लिहीतांना पर्याय ठेवून आपले अर्ज दाखल करत आहेत. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक मागणी झालेली आहे.

यापुर्वीच्या अनुभवाने भाजपा इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी तीन वाजेच्या मुदतीस काही मिनीटे बाकी असतांना उमेदवारांच्या नावाचे ए आणि बी फार्म देईल अशी शक्यता आहेभाजपाच्या उमेदवारीकडे लक्ष ठेवून रणनिती आखलेले अंदाज घेत असल्याने इतरांनी देखील पक्षीय उमेदवारी दाखल केलेली नाहीराजकीय समीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू  आहे.

सुचकाची थकबाकीदार नसल्याचा दाखल घेण्याची सक्ती नको, नगर पालिका निवडणूक लढवितांना यादीतल मतदार सुचक म्हणून आवश्यक आहेसुचक असलेल्या नागरिकाकडे नगरपालिकेची थकबाकी नको असा कोणताही नियम नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

सुचक म्हणून स्वाक्षरी करा असे म्हणत त्या मतदारांची थकबाकी भरण्यास उमेदवार पुढे सरसावतात परिणामता सुचक मतदारास एक प्रकारचे अमिष दिले जातेनगर पालिका प्रशासन थकबाकी वसुल करण्यासाठी सुचका थकबाकीदारा असावा की नसावा याबाबत बोलत नसेल मात्र उमेदवारी करणा-यांना सुचक मिळविण्याच्या बहाण्याने मतदाराची थकबाकी भरत आपलेसे करण्याची संधी मिळल्याची चर्चा येथे सुरू होती.

LEAVE A REPLY

*