त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा विजया लड्डा यांचा राजीनामा

0

त्र्यंबकेश्वरचा प्रारूप विकास आराखडा परस्पर मंजूर करणे, हरित पट्ट्यातील भूखंड पिवळे करणे असा आरोप असलेल्या त्रंबकेश्वरच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी सभागृहात अविश्वास ठराव येण्यापूर्वीच पदावरून पायउतार होत आपल्या पदाचा राजीनामा आज जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. मात्र जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अनुपस्थितीमुळे राजीनामा मंजुर होउ शकलेला नाही.

त्यामुळे शुक्रवार (दि.23) प्रांतअधिकारयांच्या अध्यक्षतेखाली होणारी अविश्वास ठरावाची बैठक होते की जिल्हाधिकारी बैठकीपुर्वीच राजीनामा मंजुर केला जातो याकडे आता लक्ष लागले आहे.
त्र्यंबकेश्वर पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात नगराध्यक्षांचे पती दीपक लढ्ढा यांनी हस्तक्षेप करत सुमारे दीडशे एकर हिरव्या पट्ट्यातील जमीन पिवळ्या पट्ट्यात रूपांतरीत करण्याचा घाट घातला असा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी उघडकीस आणत हा आराखडा स्थगित करावा, अशी मागणी केली होती.
त्यावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सखोल तपास करत प्रारूप विकास आराखड्याचा ठराव स्थगित केला. त्यानंतर लढ्ढा यांच्याविरोधात तेरा नगरसेवक एकत्र आले. डीपी प्रकरण व राजीनामा प्रकरणाचा फायदा उचलून त्यांनी जिल्हाधिकारयांकडे 17 जून 2017 रोजी नगराध्यक्षांच्या विरूध्द अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सभेची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी दि. 23 रोजी दुपारी 12 वाजता प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवली आहे. मात्र सभेपुर्वीच अविश्वासाची नामुष्की टाळण्यासाठी नगराध्यक्षा राजीनामा देत पदावरून पायउतार झाल्या.
सुमारे दोन महिन्यांपासून ञ्यंबकच्या प्रारूप शहर विकास आराखडयातील ठरावावरून नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र पक्षातच दोन गट पडल्याने काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांना साथ दिली. नगराध्यक्षा या भाजपाच्या आहेत तर त्यांच्या विरोधातील नगरसेवकांचे गटनेते हे देखील भाजपाचेच आहेत. त्यामुळे भाजपातील पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे यावरून दिसून आले. या वर्षाच्या अखेरीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची सावर्त्रिक निवडणूक होत असल्याने निवडणूकीपुर्व अखेरच्या टप्प्यात कोण नगराध्यक्ष होणार याकडे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*