Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

हरसूल : वाहनासह दीड लाखांची अवैध मद्य जप्त

Share

हरसूल : विविध प्रकारचे अवैध विदेशी मद्य घेऊन जाणारी एर्टिगा गाडी हरसूल-नाशिक मार्गावरील वाघेरा घाटात पोलिसांनी ताब्यात घेतली असून वाहनासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान सेलवास येथून सूरतकडे निघालेली एर्टिगा ( एम.एच. १२ एन.यू. ३२४७) द्वारे सूरत येथे विदेशी मद्य विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती हरसूल पोलिस स्टेशनला मिळाली. त्यानुसार सपोनि बडे यांनी हरसूल जवळील शिरसगाव फाटा ते वाघेरा घाटापर्यंत सापळा रचला होता. हरसूल-पासून नाशिककडे सदर वाहन पास होताच, पाठलाग करत वाघेरा घाट परिसरात अवैध मद्य घेऊन जाणार्‍या वाहनाला अडवत वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे महागडे विदेशी मद्य आढळून आले.

त्यामुळे लागलीच कारवाई करत सदर वाहन व मद्य-साठा घेऊन जाणार्‍या वाहनचालक मोहम्मद एजाज(वय ३२), सय्यद मकसुद अहमद (वय ४४) दोघेही राहणार सूरत यांना ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई नाशिक पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलिस उपअधीक्षक शर्मिष्टा वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे यांच्या पथकाने केली आहे.

दिव-दमण, सेलवास, तसेच अन्य मार्गानी हरसूल भागातून महाराष्ट्रात येणार्‍या अवैध मद्य वाहतूक व विक्री करणार्‍यानवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. तसेच जागोजागी चेक-नाके व गुप्त माहितीदारांची नेमणूक केली आहे. त्यामुळे अवैध मद्य-वाहतूक करणारी वाहने सहज पकडली जातील.
-शिवाजी बडे (सपोनि हरसूल पोलिस स्टेशन)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!