माजी नगराध्यक्षा विजया लढढा त्र्यंबक डीपी प्रकरणात क्लीनचीट?

0
त्र्यंबकेश्वर (वि.प्र.) | माजी नगराध्यक्षा विजया लढढा यांना त्र्यंबक डीपी प्रकरणात क्लीनचीट मिळावी अशी माहिती बाहेर आली आहे. ञ्यंबक नगर पालिकेचा प्रारूप विकास आराखडा राजपत्रात प्रसिध्द करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा विजया लढढा यांनी परस्पर पत्र दिल्याचा आरोप खोटा असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

याबाबत माजी उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी माहिती अधिकारात माहिती मिळविली असून  पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

12 मे 2017 रोजी जिल्हाधिकारी नाशिक यांना ञ्यंबक पालिका  मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी पत्र दिले व त्यामध्ये डिपी आराखडा तयार करतांना नगराध्यक्षांचा हस्तक्षेप झाल्याचे नमुद करतांना शासन राजपत्रात प्रसिध्दीचे पत्र देण्याबाबत उल्लेख केला होता.

याबाबतच ठराव क्रमांक 448 रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ञ्यंबकचा डिपी वादग्रस्त ठरला आणि त्याचे परिणाम विजया लढढा यांना नगराध्यक्षपदाचा राजनामा देण्यापर्यंत झाला.

ञ्यंबक पालिकेत सत्तांतर झाले. डिपीचा ठराव नव्याने करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात विजया लढढा आणि त्यांचे पती दिपक लढढा यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.

नगरपालिकेतून शासकीय मुद्रणालयात राजपत्रात प्रसिध्दीसाठी असे पत्र गेलेच नव्हते मात्र त्यांनी परस्पर पत्र पाठविले असा सातत्याने आरोप झाला व प्रसिध्दी माध्यमातून देखील तसे वृत्त प्रसिध्दीस झाले होते.

त्यानंतर १७ जुलै २०१७ ला येरवडा कारागृह येथून नगरपालिकेस असे कोणतेच पत्र पाठविले गेले नसल्याचे पत्र दिले होते ते दाबून ठेवण्यात आले होते. संतोष कदम यांनी माहिती अधिकारात संपूर्ण मे महिन्याच्या कारागृह मुद्रणालयाच्या आवक-जावकच्या झेरोक्स प्रती अपील होऊन प्राप्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे त्यांना त्या विनामूल्य प्राप्त झाल्या असून त्यात ही लढ्ढा यांनी असे कोणतेच पत्र दिले नसल्याचे दिसून येत आहे.

ञ्यंबकेश्वर प्रारूप शहर विकास योजना वादग्रत ठरवितांना त्यात सत्तांतर करणे हा हेतु असल्याची चर्चा तेव्हा नागरिकांमध्ये होती.

मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी दिलेल्या पत्राने त्यात भर पडली. राजपत्रात परस्पर प्रसिध्दीसाठी पत्र दिले नसल्याचे आता स्पष्ट झाल्याने या प्रकाराने आता वळण घेतले आहे.

LEAVE A REPLY

*