निवडणुकीच्या तोंडावर त्र्यंबकमध्ये पक्षांतराचा ट्रेंड; काही कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये

0
त्र्यंबकेश्वर (विशेष प्रतिनिधी) |  निवडणूक तोंडावर आली असताना पक्षांतराचा जणू ट्रेंडच सुरु झाला असून या पक्षातून त्या पक्षात सध्या जोरदार पक्षप्रवेश सुरू आहे.  त्र्यंबकेश्वरच्या नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर याठिकाणी बैठकाना उधान आले आहे. कॉंग्रेस पक्षामध्ये आज काही तरुणांनी प्रवेश केल्यामुळे शहरातील राजकारण वळण घेताना दिसून येत आहे.

कॉंग्रेसच्या बैठकीत झालेल्या प्रवेश सोहळ्यात सुनील अडसरे यांनी कार्यकार्त्यांसह प्रवेश केल्यामुळे जनतेला अभ्यासू लोकप्रतिनिधी मिळणार असल्याचे वक्त्यव्य आमदार निर्मला गावीत यांनी केले आहे.

शहराचा सर्वांगीण विकास करण्यास वेळ मिळणार असल्याने आदिवासी बहुल भागातील झोपड्यांना संरक्षण देऊन त्या न हटवता गोरगरीबाना हक्काचे घरे मिळून देण्याचे काम काँग्रेस कडून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, तालुकाध्यक्ष संपत सकाळे, शहराध्यक्ष वामन बदादे, सुनील अडसरे, युवराज कोठुळे, योगेश तुंगार, किरण अडसरे, पांडू कोरडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी मनोगत व्यक्त करत सरकार घेत असलेल्या निर्णयाने
शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर बसत असल्याचे ग्रामीण भागातील आदिवासी समाजाला ञास देण्याचे काम हुकुमशाही सरकार करत असल्याचा आरोप केला.

या बैठकीत प्रविण पाटील, शांताराम मुळाणे, दिनकर मोरे, दिनेश पाटील, पांडुरंग कोरडे, कैलास पाळेकर, संतोष नाईकवाडी, शंकर गंगापुत्र, गिरीश देवरे, शांताराम वाघ, बाळा अडसरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*