त्र्यंबकेश्वर निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी १३ तर नगरसेवकपदासाठी ९२ अर्ज दाखल

0
त्र्यंबकेश्वर |  आज त्र्यंबक नगरपरिदेसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. नगरअध्यक्ष पदासाठी १३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी एकूण ९३ अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसांनी याठिकाणी माघारी होणार आहे तेव्हा एकूण किती उमेदवार रिंगणात असतील हे चित्र स्पष्ट होणार आहे.

शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच त्र्यंबकमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच उमेदावर अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांसह दाखल होत होते.

अर्ज तपासणी करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या निवडणुकीत राज्य सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनाने मात्र याठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत तर शिवसेनेने ठराविक जागांवरच उमेदवार दिले आहेत.
तर तिकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने मात्र युती करत भाजपला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे.  दरम्यान आज सायंकाळपर्यंत नगरध्यक्षपदासाठी १३ तर १७ नगरसेवक पदाच्या जागांसाठी  ९३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक २ ब मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत बघावयास मिळणार आहे तर दबावनीती म्हणून नगरध्यक्ष पदासाठीदेखील अर्ज भरला आहे.
येत्या दोन दिवसांत माघारी आणि अवैध अर्ज प्रक्रिया पार पडेल त्यानंतर खऱ्या अर्थाने त्र्यंबकची निवडणूकित रंगत येईल.

LEAVE A REPLY

*