त्र्यंबकचा प्रचार सोशल मीडियाच्या आखाड्यात

0
त्र्यंबकेश्वर (देवयानी ढोन्नर) | त्र्यंबकेश्वरमध्ये अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपाचा कार्यक्रम अलीकडेच पार पडला. त्यानंतर सर्वच पक्षांनी आता प्रचारासाठी कंबर कसली असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आश्वासनांचा पाऊस पडत त्र्यंबकेश्वरचा प्रचार रंगात आला आहे.

सोशल मिडीयाचा प्रभावी वापर आता प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे समर्थक करताना दिसून येत आहेत. अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडनुकीचा प्रचार आता सोशल मिडीयाच्या आखाड्यात आलेला आहे.

अनेकजण फेसबुक, व्होट्सअप्प व ट्वीटरवरून निवडणूक प्रचार करताना दिसून येत आहेत.  मात्र निवडणूक आयोगाने यावर लक्ष ठेवले असून सोशलमीडियातील प्रचार खर्च न दाखवल्यास निवडणूक आयोग  कारवाई करणार असल्याचे उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.

जानेवारी २०१७ पासून निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्रचाराचा खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीत उमेदवाराकडुन केल्या जाणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष दिलेले दिसून येत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक या पदाची निवडणूक लढवत असतांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे.

त्यामुळे काही प्रमाणात बंधने आली आहेत. सोशल मीडियातुन केला जाणारा प्रचार निवडणूक खर्चात समाविष्ट करत त्या खर्चाची माहिती न देणार्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा निवडणूक आयोग उगारणार असल्याचे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिले आहेत.

फेसबुकवरून पैसे घेऊन देण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या पोस्टबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर खर्चात तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

डॉ.चेतना केरुरे -मानुरे मुख्याधिकारी

LEAVE A REPLY

*