Type to search

Video : त्र्यंबक शहरात पुरोहितांमध्ये तुंबळ हाणामारी; सर्व घटना ‘सीसीटीव्ही’त कैद

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : त्र्यंबक शहरात पुरोहितांमध्ये तुंबळ हाणामारी; सर्व घटना ‘सीसीटीव्ही’त कैद

Share

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक विधी करण्यावरून स्थानिक पुरोहितामध्ये राडा झाला. बहुउद्देशीय ब्राह्मण संघटना आणि स्थानिक ब्राह्मण यांच्यात वाद झाल्यानंतर तुंबळ हाणामारी झाली. सर्व हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम त्र्यंबक पोलीस ठाण्यात सूरू होते.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रिंगरोडवरील स्वामी समर्थ गुरुपिठाच्या समोर असलेल्या आनंद आखाडा परिसरात तीन पुरोहित नारायणनागबलीचा विधी करत असल्याचे समजले. स्थानिक पुरोहितांकडून याला विरोध म्हणून नारायण नागबली विधी सुरु असलेल्या जागी गेले. याठिकाणी शेखर कुलकर्णी, प्रशांत सवई, सुरेश सर्वज्ञ पुरोहितास बेदम मारहाण केली.

भारतीय राज्यघटनेनुसार कोणालाही, कोणताही, कोठेही, व्यवसाय करण्याचा हक्क असल्याचा दावा करत आम्ही देखील येथे नारायणनागबली विधी करणारच असा दावा करत अनेक दिवसांपासून हा संघर्ष सुरु असल्याचे येथील ब्राह्मणांनी सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!