त्र्यंबकेश्वरला दरड अंगावर कोसळून युवक ठार

0
त्र्यंबकेश्वर : येथील विनायक खिंड मेटघर किल्ल्यानजीक दरड कोसळुन एका युवकाच्या मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आनंदा काशिराम गमे (वय 27) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा युवक सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागे डोंगराच्या बाजुस प्रात:विधीसाठी गेला असता दरड अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आनंदाच्या अंगावर ब्रम्हगिरी पर्वताचा काही भाग कोसळल्याने त्याचा एक हात व कान तुटला असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, त्र्यंबक पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुधाकर मांडवकर आणि सहकारी यांनी खबर मिळताच तातडीने भेट दिली. जागेवर पंचनामा करण्यात आला आणि  शवविच्छेदन दुपारी झाले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद हा विवाहीत असून त्याच्या पश्चात बायको व दोन लहान मुलगे आहेत. जिल्हा परिषद सदस्या शकुंतला डगळे सामाजिक कार्यकर्ते संतोष डगळे यांनी ताबडतोब घटनास्थळास भेट दिली.

शासन येथील वस्त्यांकडे दुर्लक्षित करत आहे याबद्दल अधिकारयांना जाब विचारण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*