त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढली; वाहने गावाबाहेरच रोखले

0
श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार ब्रम्हगिरी प्रदक्षिणानिमीत्त होणा-या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खंबाळे येथे रविवार सकाळपासून खासगी वाहने अडविण्यास सुरूवात झाली होती. तळेगाव(अं) येथूनच वाहने खंबाळापार्कींगकडे वळविण्यात येत होती.

येथे वाहनांच्या लांबचलांब रांगा लगल्या हात्या. तिसरा सोमवार वगैरे बाबतकाहीही कल्पना नसलेल्या परप्रांतीय भाविकांची मात्रचांगलीच दमछाक झाली तर अनेकांनी खंबाळयाच्यामाळरानावर वाहने बेवारस पध्दतीने उभी करण्यासनकार देऊन नाशिकच्या दिशेने अबाऊट टर्न केला.

नाशिक ञ्यंबक रस्त्यावरील शेतकरी बांधवव्यवसायीक आणि या मार्गे जाणारे जव्हार आदिपरिसरातील प्रवाशी यांच्या हुज्जतीच्या फैरीबंदोबस्ताला असलेल्या पोलीसांशी घडत राहील्या.

शहरात सायंकाळी 5 वाजे पर्यंत शुकशुकाटहोता.तुरळक संख्येने भाविक येत होते तर नविन बसस्थानकावर बस प्रवाशांच्या प्रतिक्षेत ठप्प उभ्याराहीलेल्या दिसून येत होत्या.सायंकाळी भाविकांचाओघ सुरू झालेला दिसून आला तरी देखील पाच लाखभाविकांचा प्रशासनाने केलेला अंदाज पोकळ असल्याचेस्पष्ट झाले आहे. या निमित्ताने खंबाळे ते ञ्यंबक बस भाडे 20 रूपये असे केले आहे.

200 रूपयांच्या इंधनात नाशिक ञ्यंबक प्रवास करणेभाविकांना खासगी वाहनाने शक्य होत असते.खंबाळेयेथे वाहन पार्क केल्या नंतर 50 रूपये.5 प्रवासीअसल्यास ञ्यंबक पर्यंत प्रती प्रवासी 20 रूपये असे100 रूपये आणि परतीसाठी पुन्हा 100 रूपये असा250 रूपयांचा जादा भुर्दंड भाविकांना बसला आहे. यामुळे जादा बसभाडे का? नरेंद्र पेंडोळे  अध्यक्ष जिल्हाप्रवासी महासंघ यांनी असा सवाल उपस्थित केला.

तळेगाव फाटा ते ञ्यंबक हे बसभाडे 17 रूपये इतकेआहे आणि आता त्याच्या अलीकडे खंबाळे पार्कींगअसून ते बसभाडे 20 रूपये घेण्याचे प्रयोजन कायअसा सवाल जिल्हा प्रवासी महासंघ अध्यक्ष नरेंद्रपेंडोळे यांनी उपस्थित केला आहे.खंबाळे येथे बस थांबाकेला असून तेथे स्वच्छतागृहाची सुविधा नाही.पिण्याच्यापाण्यासाठी टँकर उभा करून दिला आहे ते पाणीपिण्यास प्रवासी नाखुश असतात.

सर्वप्रकारच्याअसुविधा असतांना जादा बसभाडे घेणे अन्यायकारकआहे.ञ्यंबक नगराध्यक्षा सौ तृप्ती धारणे यांनीनगरपालिकांच्या सेवासुविधांबाबत आढावा घेऊनमागर्दशन केले. तीर्थराज कुशावर्तावर प्रकाशव्यवस्था,सुरक्षा व्यवस्था याबाबत पाहणी केली असतादुपार पर्यंत सर्वसज्जता झालेली होती. नगर पालिकाकर्मचारी कैलास ठाकरे आदिंच्या पथकाने शहरातीलहॉटेल व्यवसायीकांच्या पाण्याचे नुमने घेऊन शुध्द पाणीदिले जात असल्याची पाहणी पुर्ण केली.
उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ दुसाणे,डॉभागवत लोंढे आदिंनी शहरात सर्वत्र फिरून तसेचगर्दीच्या ठिकाणांना भेट देऊन आरोग्यपथकांची केलेलीरचना सक्षमपणे काम करत असल्याचा आढावा घेतलाव सलग दोन दिवस वैद्यकीय सेवा सुरळीत राहील असेनियोजन केले आहे.
पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर,सुरेशचौधरी,कैलास अकुले,मेहेर आदिंसह पोलीस अधिकारीकर्मचा-यांसह सर्वत्र भेट देत पाहणी करतहोते.

LEAVE A REPLY

*