त्र्यंबकेश्वरला भाजपाला पुन्हा धक्का; विद्यमान नगरसेवक काँग्रेसमध्ये

0

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) ता. १७ : लवकरच होणाऱ्या नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपाला पुन्हा धक्का बसला आहे.

 भाजपाचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक योगेश तुंगार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मनसेतून भाजपा आणि आता कांग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. त्यांचे सोबत बाजार समिति नाशिकचे प्रतिनिधि युवराज कौथुले यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  नगरसेवक पदासाठी ते इच्छूक आहेत.

विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये तुंगार कुटुंबियांचे सदस्य विविध पदांवर कार्यरत आहेत.

दरम्यान नुकत्याच भाजपातर्फे इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून कोणाला तिकीट मिळते ही बाब गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी तुंगार यांना तिकिट न मिळण्याची कुणकूण लागल्याने त्यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

एकीकडे ही स्थिती असताना, अशा प्रवेशांमुळे काँग्रेसच्या स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. आपल्याला विश्वासात न घेता लोकप्रतिनिधी व पदाधिकारी निर्णय घेत असल्याची भावना त्यांच्या मनात वाढीस लागली आहे. त्यातून आगामी काळात काँग्रेसमधूनही पक्षांतर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान भाजपामधून विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी ऐन निवडणूकीच्या वेळेस राष्ट्रवादी-सेना आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर भाजपामध्ये चलबिचल वाढली असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*