Type to search

Featured सार्वमत

बदनामीची धमकी देत मागितली खंडणी

Share

सावेडीतील प्रकार । जाकीर शेख विरोधात गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करेन अशी धमकी देत 25 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत जाकीर शेख विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावेडीतील बिशप लॉईड कॉलनीत हा प्रकार घडला. राहुल नथानियल पाटोळे (रा. मकासरे हेल्थ क्लब मागे, सावेडी) यांच्याकडे तो खंडणी मागत होता. पाटोळे यांनीच पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. अकबरनगरमधील जाकीर शेख आणि त्याचे चार पार्टनर यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शेख आणि पाटोळे यांच्यात सावेडीतील वर्ग दोन जमिनीचा अदलाबदली व्यवहार झाला आहे.

दोन एकर जमीन बोगस खरेदी केली, ती सरकार जमा करायला लावेल अशी धमकी शेख व त्याचे पार्टनर पाटोळे यांना वारंवार देत होते. त्यापोटी 25 लाख रुपयांची खंडणी मागत होते. खंडणी न दिल्यास पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करेल अशी धमकी देत होते. पाटोळे यांच्या मित्राकरवीही निरोप पाठवित होते. पाटोळेकडे पाहतो असा धमकीचा निरोप मित्रामार्फत शेख व पार्टनरांनी पाठविला. त्यांच्या धमकीला कंटाळून पाटोळे यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!