जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मिळविले नवोदयमध्ये यश

0
सूर्यगड शाळा

सुरगाणा/कळवण ता. २० : जिल्ह्यातील आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय शिष्यवृत्तीमध्ये यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी दुर्गम पाड्यावरील सूर्यगड शाळेतील दीपक परशराम देशमुख या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव या ठिकाणी निवड झाली.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विनोद जाधव,  दीपक देशमुख, जयवंत बागुल आणि पुष्पा बागुल हे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत.

मागील वर्षी देखील सूर्यगड शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी आणि नऊ विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेंशियल स्कूल साठी निवड झाली होती. या सर्व विद्यार्थ्यांना अजय निटुरे, हरिश्चंद्र पवार, सुनिल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

पाटविहीर शाळेतील नेहा भोये ची नवोदय साठी निवड

जिल्हा परिषद आयएसओ प्राथमिक शाळा पाटविहीर, ता.कळवण येथील नेहा भोये हिची खेडगावच्या केंद्रीय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.

त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका भिकूबाई सोनवणे यांनी नेहा चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

जवाहर नवोदय पात्रता परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातून नेहा भोये पात्र ठरल्याने इयत्ता बारावी पर्यंत तिचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात होणार आहे.

तिला वर्गशिक्षिका वंदना सपकाळे  निलेश भामरे, बाजीराव गावित, साळूबाई बागूल, मिनाक्षी आहेर, सरला आहिराव यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*