माजी आमदार संजय चव्हाण यांच्याविरोधात आदिवासी संघटना एकवटल्या

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत बैठक; फौजदारी कारवाईची मागणी

0
नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयातील अनुसूचित जाती जमाती जात पडताळणी समिती उपसंचालकांना   बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी शिविगाळ केल्याच्या विरोधात आदिवासी संघटना एकवटल्या आहेत. याप्रकरणाच्या निषेधार्थ आज आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले.
तसेच नाशिकमध्ये माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यात  चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच यावेळी पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.
आदिवासी संघटनांच्या बैठकीत माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार शिवराम झोले यांच्यासह पदाधिकारी आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पिचड म्हणाले आमदार दीपीका चव्हाण यांचे पती माजी आमदार संजय चव्हाण यांनी जातपडताळणी अधिकार्‍यांना जातीवाचक शिविगाळ केली आहे. जातपडताळणी समितीचे कामकाज पूर्ण झालेले नसताना  चव्हाण यांनी सरकारी कामात अडथळा आणला आहे.
त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहीजे अशी मागणी करत ते म्हणाले की, त्यासाठी सर्व आदिवासी संघटना एकत्रीत येत असुन लवकरच गोल्फ क्लब मैदानापासुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस अशोक टोंगारे, पांडुरंग गांगड, प्रदीप वाघ, संतोष डगळे, रामदास घारे, काशिनाथ भोईर, किसन ठाकरे, लकी जाधव, महेश लांघे यांच्यासह आदिवासी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*