आदिवासी लाभार्थ्यांना शिलाई मशीन व तेलपंपाचे वाटप

0

मोखाडा : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ व आदिवासी विकास विभाग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिलाई मशीन व तेलपंप यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जि प अध्यक्ष सुरेखा थेतले, आदिवासी विभागाचे संचालक सुनिल भुसारा, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे, टिडीसी बँकेचे संचालक देविदास पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्याला शेतीकरीता नदीतून पाणी आणता यावे यासाठी तेलपंप दिल्याने नदी काठी राहणारा शेतकरी बारमाही शेती करून एक आदर्श शेतकरी म्हणून पुढे येईल असा विश्वास विष्णु सवरा यांनी व्यक्त केला. सुरेखा थेतले यांनी आदिवासी तरूणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लघु उद्योजक म्हणून नावारुपास येण्याचे आवाहन केले.
तर संचालक सुनिल भुसारा म्हणाले की,गरीब व होतकरु आदिवासी तरूणाला कपडे शिवण्याची कला व बारमाही शेती करण्याची कला अवगत असताना केवळ आर्थिक परीस्थिती दुर्बल असल्यामुळे आदिवासी कारागीर व शेतकरी घरी बसुन राहतो.
ही समस्या दुर व्हावी म्हणून आदिवासी तरुणांना शिलाई मशीन व तेलपंप वाटप करण्यात आले आहेत.त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करा असेही भुसारा म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

*