सेनेला आम्ही फसवले; भाजपनेते सुधीर मुनगुंटीवार यांची कबुली

सेनेला आम्ही फसवले; भाजपनेते सुधीर मुनगुंटीवार यांची कबुली

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यावरुन संबंध बिनसल्यानंतर दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या फसवणुकीचे आरोप होत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, सेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करून नवीन सरकार स्थापन करावे लागले.  दरम्यान, शिवसेनेची आम्ही फसवणूक केल्याची कबुलीच भाजपनेते सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत केला.

ते म्हणाले, आम्ही शिवसेनेला फसवले, पण आमच्या चुकीचा तुम्ही एवढा मोठा फायदा उचलला. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू असे मुनगुंटीवार यांनी वक्तव्य केले.

मुनगुंटीवार यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुसरीकडे भाजप मात्र राज्यात पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे.

मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष देण्याचा शब्द भाजप नेत्यांनी  दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी करत भाजप खोटे बोलत असल्याचे विधान वारंवार केले होते.

तर मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष देण्याचा शब्द दिला नव्हता असे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत शिवसेनेला सुनावत मुख्यमंत्री पदावर हक्क दाखवला होता.

यावर मुनगुंटीवार यांनी भाजपकडून शिवसेनेची फसवणूक झाल्याची कबुली दिल्यामुळे भाजप पुन्हा एकदा राज्यात   तोंडघशी पडले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com