डांभुर्णी येथे 16 वर्षीय मुलाचा खुन

डांभुर्णी येथे 16 वर्षीय मुलाचा खुन
एका 16 वर्षीय मुलाच्या डोळ्यात कोणीतरी अज्ञात इसमाने काड्या खुपसून तसेच डोक्यावर जड वस्तू मारून खून केल्याची घटना डांभुर्णी परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली घटनेची माहिती कळताच यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी रवाना झाले पुढील चौकशी पंचनामा सुरू असल्याची माहिती मिळाली.
डांभुर्णी येथील कैलास चंद्रकांत कोळी वय 16 हा तरुण मुलगा काल दिनांक 2 पासून घरातून तसेच गावातून बेपत्ता झालेला होता त्याचा शोध सुरू असताना आज दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास कोणालातरी तो डांभुर्णी शिवारातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात मयत स्थितीत आढळून आल्याची माहिती मिळाली ग्रामस्थ घटनास्थळी गेल्यानंतर मयताच्या डोळ्यात काड्या खुपसून तसेच डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, सदर संशयित मुलगा हा काल संध्याकाळी संशयित बरोबर गेलेला होता  दत्तात्रय माणिक पाटील यांच्या शेतात सदरचा मृतदेह आढळून आला
 यावल पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच यावं ल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले  पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहे .
मयत मुलाचे वडील हे मूळचे भालशिव पिंपरी येथील रहिवासी असून ते डांभुर्णी येथे मोलमजुरी करण्यासाठी रहिवासासाठी आलेले होते मयत कैलास उर्फ बंटी कोळी यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली असून एक पेपर अजून बाकी आहे मागील वर्षी संशयित मुलांनी असेच एका लहान मुलाच्या डोळ्यात काड्या खोचून गुन्हा केलेला होता मयत कैलास कोडी याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात संध्याकाळी शवविच्छेदनासाठी आणण्यात आला .
सदर घटनेबाबत यावं ल पोलीस आणि घटनास्थळ व परिसर रात्री उशिरापर्यंत पिंजून काढला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com