ना फेरीवाला क्षेत्रात फळविक्री करणाऱ्या महिलेला हटकले; आयुक्त निवासस्थानासमोर फेकली फळे

ना फेरीवाला क्षेत्रात फळविक्री करणाऱ्या महिलेला हटकले; आयुक्त निवासस्थानासमोर फेकली फळे

नाशिक | प्रतिनिधी 

नो फेरीवाला झोन मध्ये हातगाडी लावून फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्या महिलेस अतिक्रमण पथकाने हटकले असता या महिलेचा राग अनावर झाल्याने महापालिका आयुक्तांचे निवासस्थान असलेल्या ठिकाणी हातगाडीवरील काही फळे फेकल्याचा प्रकार घडला. याप्रकणी रस्त्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुंबई नका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडकरी चौक परिसरात एक फळविक्रेती महिला ना फेरीवाला झोन असतानाही फळविक्री करताना दिसून आली. याठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला या परिसरातून जाण्यास सांगितले.

यानंतर प्रचंड राग अनावर झालेल्या महिलेने गडकरी चौकातील महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर  हात गाड्यावर असणारे काही फळं रस्त्यावर टाकुन अडथळा निर्माण केला. तसेच पश्‍चिम विभागाचे अतिक्रमण कर्मचारी श्रीराम मधुकर गायधनी यांच्याशी वाद घालून वजन काट्याच्या भांड्याने स्वतःच्या डोक्यावर मारून घेऊन आरडा ओरड करीत अतिक्रमण विभागाच्या गाडी समोर येऊन बसली व सरकारी कामात अडथळा आणला.

म्हणून या फळविक्रेत्या महिलेवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आल्याची

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com