लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती; महिलेला बस स्थानकावरच पेट्रोल टाकून जाळले; उपचार सुरु
स्थानिक बातम्या

लासलगावमध्ये हिंगणघाटची पुनरावृत्ती; महिलेला बस स्थानकावरच पेट्रोल टाकून जाळले; उपचार सुरु

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक / लासलगाव | प्रतिनिधी

हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आज घडली. एका महिलेवर पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या घटनेत महिला ५० टक्के भाजल्याची संतप्त घटना घडली आहे. महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या आवारात ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट येथे तरुण शिक्षिकेला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना आज नाशिक जिल्ह्यात अशी घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. महिला ५० टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून मुख्यमंत्री बंदोबस्तात व्यस्त असलेल्या नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

सदर महिलेस लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. दरम्यान, हा प्रकार प्रकरणातून झाल्याची चर्चा आहे.

Deshdoot
www.deshdoot.com