कॉलेजरोड परिसरात बिबट्याचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर
स्थानिक बातम्या

कॉलेजरोड परिसरात बिबट्याचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील अतिशय वर्दळीच्या भागात आज सकाळी बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून महिलेवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी वनविभगाचे अधिकारी तसेच नाशिक शहर पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. वीसे मळा परिसरातील श्रद्धा पेट्रोल पंप रोडवर ही घटना घडली.

शहरातील कॉलेजरोडवर असलेल्वया सलीम चाय टपरीजवळ सकाळी दहाच्या सुमारास एका महिला रस्त्यावरून जात असताना या महिलेवर याठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला.

या घटनेत महिला बालंबाल बचावली असून या महिलेला जखमी अवस्थेत नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे.

बिबट्याचा शोध सुरू असून, हा बिबट्या नेमका कुठे गेला? कुठल्या परिसरातून या वर्दळीच्या ठिकाणी आला याबाबत वन विभाग माहिती घेत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये तसेच घाबरूनदेखील जाऊ नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com