जळगाव : जिल्ह्यातील वाईन शॉप्स उद्यापासून होणार सुरू
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यातील वाईन शॉप्स उद्यापासून होणार सुरू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्ह्यातील वाईन शॉप्स (दारुविक्रीची दुकाने) मंगळवार दि.5 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्याबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील आदी उपस्थित होते.

सोमवारपासून लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना दारू दुकाने ही मंगळवार दि. 5 मे पासून सुरू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकार्‍यांनी केली.

यात फक्त वाईन शॉप्स सुरू होणार असून संबंधीत दुकानदाराला सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील परमीट रूम, बियर बार आदींना मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्ह्यातील गॅरेज व स्पेअरपार्ट विक्रीची दुकाने देखील सुरू राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com