Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचक्रीवादळाला अम्फान नाव कसे पडले? कोण ठरवतं वादळांची नावं? जाणून घ्या…

चक्रीवादळाला अम्फान नाव कसे पडले? कोण ठरवतं वादळांची नावं? जाणून घ्या…

नाशिक | देशदूत डिजिटल डेस्क

सुपर सायक्लोन ‘अम्फान’ रौद्ररूप धारण करून आज समुद्र किनाऱ्याला धडक देण्याच्या तयारीत आहे. वादळाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना आणि वायुदलालदेखील अलर्ट आहे. या वादळामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात असून ठिकठीकाण राष्ट्रीय आपत्ती निवारणचे जवान मदतीसाठी हजर झाले आहेत. या चक्रीवादळाचा फटका भारताला अधिक बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

२०१४ साली आलेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळाहूनही हे वादळ भयंकर आणि विध्वंसक असल्याचे बोलले जात आहे. २०१४ मध्ये ‘हुडहुड’ वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांसारख्या समुद्रकिनाऱ्यावरच्या राज्याशिवाय उत्तर प्रदेशसहीत अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडवला होता.

अनेकांना प्रश्न पडले असतील. कुठून आले हे वादळ. वादळाचे नामकरण कोण करत असेल. ‘अम्फान’ चक्रीवाळाचं नामकरण थायलंडने केले आहे. बंगालच्या उपसागरात या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाले.

वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडीशा याठिकाणी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोलकाता येथील हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या (दि.२०) रोजी हे वादळ दुपार ते सायंकाळपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सागर द्वीपसमुह आणि बांगलादेशच्या हतिया दीपसमुहाच्या मधून जाऊ शकते.

या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू ओडिशातील पारादीपपासून ९८० किमी दक्षिणेला, पश्चिम बंगालच्या दिघा पासून ११३० किमी दक्षिणेला आणि बांग्लादेशच्या खेपूपारा पासून १२५० किलोमीटर दूर दक्षिनेला असल्याचे बोलले जात आहे.

अम्फान ही २००४ साली तयार करण्यात आलेल्या वादळाच्या यादीतील शेवटचे नाव आहे. या वादळाच्या नावाचा प्रस्ताव थायलंडकडून देण्यात आला होता.

जगातील वादळाचे नावे पाच समित्या ठरवितात. (1) इस्‍केप टाइफून कमेटी (2) इस्‍केप पैनल ऑफ ट्रॉपिकल साइक्‍लोन (3) आरए 1 ट्रॉपिकल साइक्‍लोन कमेटी (4) आरए- 4 (5) आरए- 5 ट्रॉपिकल साइक्‍लोन कमेटी असे या समित्यांची नावे आहेत.

सर्वात आधी जागतिक हवामान विभागाकडून वादळांना नावे ठेवण्याची सुरुवात करण्यात आली होती. भारतात या वादळांच्या नावांची सुरुवात २००४ पासून सुरुवात झाली. भारतासोबतच पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, म्यानमार, ओमान आणि थायलंडने या वादळांना नावे देण्याचा एक एक फॉर्मूला तयार केला.

या आठही देशांच्या वतीने सांगण्यात आलेल्या नावांच्या पहिल्या अक्षरापासून या वादळाचे नाव निश्चित केले जाते. या क्रमानुसारच वादळांच्या नावांची निश्चिती होते.

या आठ देशांनी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनाइजेशन (World Meteorological Organization) ला वादळांच्या नावांची लिस्ट दिली आहे. यामध्ये भारताने ‘अग्नि’, ‘बिजली’, ‘मेघ’, ‘सागर’ आणि ‘आकाश’ असे नावे दिले आहेत. तर पाकिस्तानने ‘निलोफर’, ‘बुलबुल’ आणि ‘तितली’ यासारखे नावे दिले आहेत. या नावांमधूनच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनाइजेशन वादळाचे नाव ठेवते.

या आठही देशांनी पाठवलेल्या नावांमधून टप्प्याटप्प्याने नावे ठेवली जातात. भारतात १० वर्षांत वादळाचे नाव दुसऱ्यांदा वापरण्यात आले नाही. तसेच अधिक नुकसान किंवा हानी पोहोचविणाऱ्या वादळाचे नाव या यादीतून हद्दपारदेखील केले जाते. यावेळी थायलंडने पाठविलेल्या नावातून वादळाचे नाव ठेवले जाणार होते. त्यामुळे थायलंडने अम्फान हे नाव ठेवले आहे.

अमेरिकेत महिला आणि पुरुषांच्या नावांनी ठेवले जातात वादळांना नावे

अमेरिकेत दरवर्षी वादळांच्या २१ नावांची यादी तयार केली जाते. इंग्रजीतील बाराखडीनुसार हे नावे ठेवली जातात. तसेच Q, U, X, Y आणि Z या अक्षरांनी नाव ठेवल्याची परंपरा नाही. जर एक वर्षात २१ पेक्षा अधिक वादळे आली तर पुढील नावे ग्रीक अल्‍फाबेट अल्‍फा, बीटा, गामा सारख्या नावांनी वादळे ओळखली जातात.

तसेच यामध्ये सम विषम फॉर्मूला वापरला जातो. विषम वर्षी वादळांची नावे महिलांच्या नावे तर  सम तारखेला पुरुषांच्या नावे वादळांची नावे ठरतात. म्हणजे जसे की, 2019, 2021 आणि 2023 मध्ये वादळांची नावे महिलांच्या नावांनी ठेवली गेली. तर 2018, 2020 आणि 2022 मध्ये आलेल्या किंवा येणाऱ्या वादळांची नावे पुरुषांच्या नावांनी ठेवली जात आहेत किंवा जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या